Begin Your Journey in Eight Steps

Chapter 1 · Begin Your Journey in Eight Steps

Understand why preparing for conception matters, and what these 8 chapters cover.

जमीन, हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश सारखाच मिळाला, तरी प्रत्येक शेतकऱ्याचे पीक सारखे येत नाही. उत्तम पिकासाठी केवळ चांगले बी पुरेसे नसते. जमिनीची तयारी, योग्य पोषण, अनुकूल वातावरण आणि नियमित निगा हेही तितकेच महत्त्वाचे असते.

हाच विचार गर्भधारणेपूर्वीच्या तयारीलाही लागू होतो.

बहुतेक जण बाळासाठीची तयारी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सुरू करतात. पण ही तयारी खरोखर तेव्हाच सुरू व्हायला हवी का?

आपल्या वैदिक परंपरेनुसार गर्भाधान ही केवळ शारीरिक घटना नाही. नव्या जीवाला आमंत्रित करण्यापूर्वी आई आणि वडील दोघांनीही शरीर, मन, नाते आणि जीवनशैली यांची तयारी करण्याची ही जबाबदार प्रक्रिया आहे. या विचारपूर्वक तयारीला गर्भाधान संस्कार म्हणतात. सोळा संस्कारांमधील हा पहिला संस्कार आहे.

केवळ प्रेग्नन्सी कशी प्लॅन करावी हे जाणून घेणे पुरेसे आहे का?

केवळ प्रेग्नन्सी कशी प्लॅन करावी हे जाणून घेणे पुरेसे आहे का?

प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये बहुतेक लक्ष फर्टाइल दिवस, मेडिकल रिपोर्ट्स आणि आहारावर असते. हे सर्व आवश्यक आहे; मात्र गर्भधारणेची तयारी केवळ शरीरापुरती मर्यादित नसते.

पती-पत्नी दोघेही मानसिकदृष्ट्या तयार आहेत का? दोघांची जीवनशैली निरोगी आहे का? नात्यात प्रेम, संवाद आणि परस्परसंमती आहे का? पालक म्हणून येणारी जबाबदारी दोघांना समजते का? भावी बाळासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प आहे का?

Key takeaway: गर्भाधान संस्कार या सर्व पैलूंकडे एकत्रितपणे पाहण्याची दृष्टी देतो.
या आठ प्रकरणांनंतर तुम्हाला समजेल

या आठ प्रकरणांनंतर तुम्हाला समजेल

गर्भाधान संस्काराचा खरा अर्थ, आई-वडील दोघांची तयारी का आवश्यक आहे, शरीर, मन, आहार आणि नात्यात कोणते बदल करता येतील, गर्भाधानासाठी शास्त्रांमध्ये कोणता काळ योग्य मानला आहे, मासिक पाळीचे चक्र आणि फर्टाइल विंडो कशी समजून घ्यावी, प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये अडचणी येण्यामागे कोणती कारणे असू शकतात, दीर्घकाळ प्रयत्न करणाऱ्या जोडप्याने वैद्यकीय मार्गदर्शन कधी घ्यावे, आणि हे सर्व रोजच्या जीवनात कसे अमलात आणावे.

हा तुमच्या 90 दिवसांच्या गर्भाधान संस्कार प्रवासाचा रोडमॅप आहे.

You'll Come Away Knowing

गर्भधारणा नियोजन फक्त फर्टाइल दिवस आणि रिपोर्ट्सपुरते मर्यादित का नाही
सर्व 8 प्रकरणांमध्ये तुम्ही काय शिकाल
गर्भाधान संस्कार परंपरा, निसर्ग आणि विज्ञान यांना कसे एकत्र आणतो
Up next Chapter 2 · The Science of Preparing for a Healthy Child Finished all chapters? Quick Revision 20 swipeable cards